जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY
HAPPY BIRTHDAY, VIJAY
HAPPY BIRTHDAY VIJAYRAO
विजय भोकरे .. second year पासूनचा माझा एकदम जिगरी दोस्त.
First year ला फारसी ओळख नव्हती पण second year ला Rakesh च्या सहवासाने विजय शी दोस्ती जमली ती आजपर्यंत.
एकदम रोखठोक माणूस. नाकासमोर सरळ चालणारा...कधीही कुठल्याही Controversy मध्ये नसणारा.. आपण ,आपली family , अभ्यास आणि Milind and Kaustubh ( आणि मीही ) सारखे समविचारी मित्र एवढंच काय त्याच विश्व.
Typically middle class family आणि तेही Brahmin मधील हा माझा मित्र . घरी आई , बाबा , ताई आणि विजय... सुखी चौरस कुटूंब .
त्यामुळे विजय मला RAKESH पेक्षा जास्त जवळचा वाटे.
माझा Indiranagar मधील flat घेण्याच कारणही हेच .
RAKESH आणि त्याच Family Background म्हणजे जरा उच्चभ्रू वर्गातील.
RAKESH कडे घरी जायचं दडपण येत असे पण विजय बद्दल असं कधीही जाणवलं नाही.
आई बाबांचा प्रचंड आज्ञाधारक मुलगा..आणि त्यांची मूल्य कायम पाळणारा ..
अगदी आजही तो तसाच आहे जसा college time मध्ये होता.
खरतर फक्त बाबा म्हणत आहेत की Govt service आणि त्याबरोबर येणार्या drawbacks ( for example cast politics etc ) मध्ये पडायचं नाहीये . केवळ त्यासाठी म्हणून MO Ship झिडकारून हयाने private practice सुरू केली.
मला माहित नाही ,हा त्याचा हा निर्णय बरोबर की चूक होता पण शंभर टक्के आपण एक चांगला consultant गमावला.. अर्थात Mrs. Bhokare यांनी Gynecologist बनून VIJAYRAO यांच स्वप्न पूर्ण केल.
आपल्या Batch चा पहिला Private Practitioner चा मान विजयराव याच्या कडे जातो..
RSS चा हा कट्टर समर्थक आणी खंदा कार्यकर्ता ..
कितीतरी वेळा Free Exam and Investigation Camp Arrange करणारा
त्याच्याकडे CAMP असले की कधी तरी मीही जायचो .
आजही त्याच रविवारी सुट्टी च्या दिवशी RSS related work चालूच असतं.
हा Social service मध्ये कायम अग्रणी.
आईने दिलेला हा वारसा अगदी समर्थपणे पुढे चालवणारा विजय हा एखादा दुसराच असतो.
He is a True Hero of Indiranagar Nashik.
या सर्व गोष्टी करता करता स्वतःला जे आवडतं ते ही करणारा .
MA Psychology करून विजयराव यांनी हे सिद्ध केले
आपल्या मतांवर कायम ठाम असणारा हा माणूस .
जे आहे त्यामध्ये समाधान माणणारा , उगाच काहीतरी अवास्तव अपेक्षा न ठेवणारा.
" ठेविले अनंते तैसेची रहावे " या उक्तीवर चालणारा.
काहीजण याला "अल्पसंतूष्ठ" ही म्हणतील पण तरीही असेच लोक तुलनात्मक् जास्त सुखी असतात .
एका middle class family मधील विजयरावांनी आज जे काही साध्य केले आहे आणि तेही अतिशय सचोटीने , कष्टाने .. कूठल्याही प्रकारचा वाममार्ग न पत्करता हे अपवादात्मक आहे .
असे लोक फार दुर्मिळ असतात आणि next generation साठी आदर्शही .
Few relationships are not from blood relations but they value not less than that.
आणि काही जणांचे आपल्यावर जे उपकार असतात त्याची परतफेड न करता त्या ॠणात राहणंच योग्य असतं .
माझ्या साठी विजय त्यातील एक.
Arpana Rao शी लग्न करण्याच्या वेळी ( which was against her Appas will ) ,
Hotel Sai palace मधील Hall book करण्यापासून ते गुरूजी arrange करण्या पर्यंत आणि विजय च्या आईबाबांनी तिचं केलेले कन्यादान यासाठी मी आयुष्यभर
त्यांच्या ॠणात राहील..
From that day, he became VIJAYRAO for me.
आजही मी जेव्हा नाशिकला जातो विजयरावांना भेटल्याशिवाय माघारी येत नाही.. For me he is a dear "SALA" .
माझे आपल्या Batch मधील जे काही अतिशय जवळचे मित्र आहेत ,त्या सर्वांच्या अगदी परस्परविरोधी स्वभाव असणारा विजयराव.. अगदी विरुद्ध विचारांचा..
The totally opposite type of personality.
विजयराव म्हणजे एकदम शिस्तबद्ध आयुष्य जगणारा... प्रत्येक गोष्टीत नियंत्रण ठेवणारा .. .कायदा plus कानून perfectly पाळणारा..
,,हुल्लडबाजी या बाबत प्रचंड तिरस्कार
कधी कधी वाटतं, बर झालं की विजयरावांनी एकही GT Attend केले नाही...
पण एकदा तरी विजयरावांना Prof Ajit and Rupesh बरोबर Banquet and Dance floor वर enjoy करायला लावायचं आहे..
या वाढदिवसाच्या निमित्ताने विजयराव तूम्हाला खूप खूप शुभेच्छा .
तूम्हाला उदंड आणि आरोग्य संपन्न आयुष्य लाभो ...
आपलाच JD.
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment