जीवेत शरद: शतं !!! Dr. Mahendra Rajole
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महेंद्र राजे. . . मागे सांगितल्या प्रमाणे नविन पंडित colony मध्ये दोन राजे होते मंदारराव आणि महेंद्र राजे.. . महेंद्र राजे यांचा आज वाढदिवस...
काही जण फक्त राज्य करायला जन्माला आलेले असतात.. महेंद्र राजे त्या तीलच एक. नविन पंडित colony चे अनभिषिक्त सम्राट...Prof .Ajit च्या साथीत हा माझा इतका जवळचा मित्र कसा झाला ते समजलेच नाही.
हया माणसाचं सगळे काही एकदम वेगळ.. अगदी ...जगावेगळ. MBBS first year ला जेव्हा Prof Ajit आणि राजे आमच्या Dr Lele hospital compound च्या रूमवर यायचे तेव्हा JP ची Goldflake नुकतीच संपलेली असायची आणि माझ passive smoking ही...राजे आले की पहिली पाच मिनिटं तलवार बाजी सारखे हातवारे करून हवा शुद्ध करण्यात जात. आणि नंतरची मला lect देण्यात how dangerous passive smoking is.. . prof Ajit and JP मात्र त्या कडे साफ दुर्लक्ष करत.. Cigarette and alcohol हया बद्दल प्रचंड तिरस्कार...परंतु त्या नंतर काही थोडया काळात च goldflake चा एक एक झुरका मारत मारत असे किती तरी झुरके इतक्या सफाईदारपणे राजे कसे मारायला लागले हे माझ्या विचारी शक्ती च्या पलीकडचे होते prof Ajit बद्दल मी समजू शकत होतो ,पण राजे. ?????.. . ..
काही काळाने Tiger ची यात entry झाली...आणि मग काय ती धमाल संध्याकाळी रूमवर असताना . रस्त्यावरून ये JD अशी आरोळी आली की चुपचापपणे सगळी पुस्तकं बंद करून या सगळ्याबरोबर फिरायला निघायचे....Gymnasium hall च्या पूढे , Girls hostel च्या opposite side ने एका Residential colony मधील रस्त्याने सरळ गोदावरी काठ.... संध्याकाळी बरयाच ऊशीरा पय॔त दोन तीन goldflake आस्वाद ही मंडळी घ्यायची ...मग नंतर यावर updegradation कधी झालं ते समजलंच नाही.. राजेंना . त्या वेळी renal colic होतं अस ते सांगायचे आणि बघता बघता हे सर्व JP च्या पंक्तित आले.. त्या च्या पंडित colony तील flat वरही असे हवेचे शुद्धीकरण खूपदा होत असे.. माझ्या साठी समाधानाची बाब म्हणजे मला कधीही यापैकी कोणी काहीही compulsion केलं नाही... च्या bottles ची विल्हेवाट लावण्याचे काम माझ्या कडे असायचं...एका खास बंगल्या च्या गेटवर...राजें च्या आज्ञाहून Tiger ही त्या च्या bottle च विसर्जन रात्री उशिरा शहरात जाऊन करून येत असे , त्या मुळे राजें ते Renal colic च होतं की दूसरं कुठलं Colic / pain होत असा प्रश्न मला पडायचा.... Prof. Ajit ला असे प्रश्न कधी का पडत नसत की तो ते प्रश्न पडण्याची मेंदूला तसदी देत नसे हे गुलदस्त्यातच होतं . आणि राजे आपले problems कधी कुणाशी share करत नसत. आता आजकाल कधीतरी ते मन मोकळं करतात आमच्या सारख्या जवळच्या मित्रांबरोबर...पण आता काय उपयोग.. ..
रूमवर JP आणि इतर वेळी राजे prof Ajit and Tiger याबरोबर कसा वेळ जायचा ते समजलेच नाही... . राजेंची blue colur ची Bajaj scooter मागे मी आणि Tiger ची green colour ची M 80 आणि मागे prof Ajit...नाशिक चे बरेच रस्ते फिरलो आणि आणि जवळपास सगळी थिएटर्स... .
राजे कधीही कोणाचं ऐकत नसत.. just give order आणि आपण तीच पालन करणं हे काय ते आपल्या हातात.... English movies वरील राजेंच प्रेम ही असच...Vikas ला frequently visit देणारा मी Circle लाही राजें बरोबर गेलो...बर्याच दा जबरदस्तीने ..अर्थात तिकिटाचे पैसे बरयाच वेळा राजेच चूकते करत...नावाप्रमाणेच राजा माणूस.. हे जे काही करणार ते अचंबित करणारं... S econd year ला इथे KD Tripathi..वाचता वाचता माझ्या नाकी नऊ यायचे आणि राजे Goodman Gillman घेऊन बसणार आणि notes काढणार.. .Bhende Deodhar वाचता वाचता मला घाम फूटणार आणि राजे Big Robbins मधून notes लिहीणार....सगळंच माझ डोक गुंग करणारं.... आणि हे सर्व Kishor da ची गाणी ऐकत...Raje is Legand अस वाटावं.
Second year .Final exams .. Pathology चा पेपर मी राजे च्या flat वर . अभ्यास करायला..रात्री ऊशीरा पय॔त मी जागा ..राजें च " ऐ मला दोन तासांनी जाग कर..."पहाटे पय॔त हेच चालू...शेवटी सकाळी मी पेपर देत नाही रे JD.......मी फूल्ल टू टेंशन मध्ये ....राजें ची आई सकाळी मला चहा आणि बिस्कीट देताना महेंद्र चा अभ्यास झाला ना रे ? आणि तुझाही? All the best असं जेव्हा बोलली, तेव्हा माझी काय परिस्थिती झाली असेल विचार करा....खरं तर मी त्यांचा कोण होतो? पण अतिशय प्रेमळ . प्रचंड माणुसकी जपणारे राजे आणि त्याची फॅमिली. मला pathology चांगले marks मिळाले .. केवळ राजें च्या आईचा आशिर्वाद .परंतु ज्या pathology मध्ये राजे अडकले ..त्याच pathology मध्येे BJ मधून MD करून ते आज ते नाशिक मधील patholgy fraternity चे खरे खूरे King आहेत . He is having terrific command on the subject..Accuracy and decision मध्ये राजेंचा हात कोणी धरू शकत नाही..
He is a perfectionist .... ... Luxurious Lavishness काय ते यासाठी राजें कडे बघाव....12 lacs ची Mahindra Marrazo आणि त्यात 5 lacs चं interior.....अरे घरात interior करताना मी विचार करतो आणि राजे गाडीत करतात.....कारण काय तर. 17 lacs topend model घेण्या पेक्षा 12 lacs baseline model घेऊन त्या त मनासारखे interior कराव....आणि Marrazo यासाठी की ती Indian Company ची आहे......आहे ना सगळं जगावेगळं.
Live life king size ...Larger than life....is his rule....मग ते काहीही असो.... घर , कपडे, गाडी , खाणं पिणं की knowledge आपल्या subject वरची command ...आणि मित्रावरच प्रेम सगळंच काही..... . .
He is born to rule ... at the same time he is happy family man careful and loving father of Pari ...his daughter ...
मी स्वतः ला नशीबवान समजतो राजें सारखा मित्र मला लाभला...आणि college days मध्ये बराच काळ राजे prof Ajit JP and Tiger Late RD Vijay B Kaustubh या सारख्या अनेक मित्राबरोबर व्यतीत करायला मिळाला... . . .
असे राजें चे खूप किस्से.. college च्या first year पासून ते Internship आणि PG पासून ते आजपर्यंत . राजें बरोबर खूप काळ एकत्र घालवला.......हे ॠणानुबंध असेच राहोत.... .
राजे... पुण्याला जाताना आमच्या कडे भेट देण्या चा शिरस्ता आपण आजतागायत पाळलाय...पुढेही अशीच सेवेची संधी द्याल......
आपल्याला दीर्घायुष्य लाभो.. . आणि.. राजे , आपण असंच राजासारखं आयुष्य जगावं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ही परमेश्वर चरणी प्रार्थना....
DR JAYANT DEOKAR
Precious memories, JD. Very nicely written. Unknowingly you might have opened the Pandora s box!!! Happy Birthday once again, dear MR. Love , Swati
ReplyDelete