जीवेत शरद: शतं !!! Dr. Sunil Patil
मोबाईलच्या पडद्यावरील सनिल पाटीलअसं नाव वाचल की आपसूकच ओठावर स्मितहास्य पसरत ,कोणाचाही वाढदिवस असो सुनीलचे greeting card अगदी बघण्यासारखे असते
GT साठी तयारी करायची मिटींग असु देत की त्यासाठी hotel visit असु देत हा पठ्ठ्या सगळ्यात पुढे व सगळ्या जबाबदार्या अगदी व्यवस्थीत पार पाडण्यात याचा हातखंडा , हा जन्मजात व्यवस्थापकच आहे असं म्हणा हवंतर
.....
आजपर्यंत वेगवेगळ्या मित्रांबद्दल व्यक्तिचित्रण केलय पण डाॅ सुनिल पाटील हे वादळ शब्दबद्ध करण म्हणजे एक शिवधनुष्य पेलणं ,
अगदी अजब अनाकलनीय रसायन
भौतिकद्रृष्ट्या कुठल्याही पदार्थाहून कठिण
अन् मेणाहून सुद्धा मऊ
सर्वांचा प्राणप्रिय , हवाहवासा व हुरहुन्नरी जीव
राजकारणाचा प्रचंड अभ्यास
प्रचंड ऊर्जेचा स्रोत
वैद्दकशास्राचा गाढा उपासक
असं सर्वमान्य असाधारण
कणखर तितक्याच हळव्या मनाचे भाऊक
शास्रशुद्ध अतिशय बुद्धिमानी
सडेतोड स्पष्टोक्ता गप्पींष्ठ सांगाती
जे होईल ते होईल पण खर बोलणारं
कोणाच्या बा....( बरेच टिंब आहेत )
न घाबरणार
दिलखुलास मनमोकळ पारदर्शक
( एकाचवेळी बरेच विरूद्धार्थी शब्द आलेत पण सगळे शत प्रतिशत सत्य आहेत )
एक unique महान व्यक्तिमत्व
काहीही असो पण माणूस मात्र अंतरंगाने
एकदम निर्मळ , आरशासारखा स्वच्छ
Critical पेशंटसाठी तर ते मसिहा तर कधी सांताक्लॉज झाले
त्याला वाचविण्यासाठी stable करण्यासाठी ते
अगदी प्रामाणिकपणे मनापासून झोकून देतात
म्रृत्युच्या दाढेतून अक्षरशा बाहेर काढतात
प्रसंगी तहानभुख झोप आराम विसरून विठुमाऊली होतात
ती त्यांची passion आहे
साधना आहे , भक्ती आहे .
कामगारांसाठी काम करत असतांना कधीकधी ते बच्चू कडुंच्या प्रभावात जातात मग असत्य ढोंगीपणा किंवा खोट्याची चिड आली की
सर कोणालाही जुमानत नाही , चुकीलाऽऽऽ
माफीऽऽऽनाही ..,
सर mold होत नाहीत , समोरांच्या मनासारखे वागत नाही
सरांना कधीही professional होण जमल नाही
जमणारही नाही
सौ मँडमची भरभक्कम साथ असल्याने सरांचा यशाचा मार्ग सुकर झालाय ,
आज तुमचा वाढदिवस कुटुंबीयासाठी आप्तस्वकींयांसाठी मित्रांसाठी एक आनंदमयी सुरेल क्षण
खर तर तो जोरदार साजरा व्हायला पाहिजे अगदी हास्यरंगाची उधळण करत
विनोंदाच्या आतषबाजीत
मित्रांच्या मैफिलीत
गप्पांच्या गर्दीत
तुमच्या आवडत्या शैलीत
तुमच्या पद्धतीन unique अद्वितीय
आजच नाही तर रोजच व्हावा नेहमीच व्हावा
अविरत अविस्मरणीय
तुमच्या आयुष्यात रहावा फक्त निखळ आनंद अगदी निष्पाप निरागस बालकांच्या हास्यासारखा !
कधीही न संपणारा
पुनःश्च एकदा वाढदिवस अभिष्टचिंतन
पूजनीय दादाजींच एक छान सुभाषीत ख़ास तुमच्यासाठी
मुश्किलें आएंगी आने दो ,
सागर में तूफ़ान उठने दो ।
हमें रूकना नहीं ,
हमें झुकना नहीं ।।
DR. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment