जीवेत शरद: शतं !!! Dr. Nilesh Shelar





वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निलेश




आज दिवाळीचा दुसरा दिवस  व डाॅ निलेश शेलार यांचा प्रकटदिन . हा फक्त योगायोग नाही तर निश्चितत: एक कार्यसिध्दता असावी. 








      कालिदासांच्या रघुवंश या रघुवंशीय राजांच्या आजन्म शुध्दनामाची आठवण होते. आपला या सुंदर आयुष्यात तीन गोष्टींसाठी जन्म झाला. 


एक मात्यापित्याची पुण्याईने,


दुसरा आपल्या कर्मानुसार,


तर तिसरा वैश्विक गरजेतुन ;


आपल्या हातून या विश्वासाठी काही कार्य व्हाव, काही अपुर्ण पुर्णत्वास जावं, समृध्द व्हावं, खर तर अशीच काही परमेश्वरीय इच्छा असावी म्हणूनच रोग्यांचं  दु:ख नाहीस करणं , त्याच्या आयुष्यात आनंद द्यावा हीच पुर्णत्वाची प्रचुरता डाॅ निलेश आपल्या या वैश्विक जन्माचा विनियोग निश्चितत: अनुकरणीय आहे . 





मनानं अतिशय निर्मळ ,


सतत हसतमुख


प्रचंड सकारात्मक उर्जा 


कुटुंबासाठी , नातलगांसाठी आधारवड


मित्रांसाठी प्रेमळ सखा,अजातशत्रु ,


रोग्यांसाठी धन्वंतरी,


समाजासाठी प्रेरणा,


अस्थीरोगशास्राचा गाढा अभ्यास व अस्थीरोगशास्रासाठी समर्पित असलेल्या निलेशला नक्कीच सर्वाधीक शुभेच्छा व स्नेहभाव.





    आपलं आयुष्य असंच रुपमय व्हावं , आपल्या सर्व मनोकामना पुर्ण व्हाव्यात , आपल्या हातुन गरजवंतांची सेवा घडावी हीच आजच्या या आनंदमयी दिवशी परमेश्वराकडे मन:पूर्वक प्रार्थना .





एतां रामबलोपेतां रक्षा य: सुक्रुती पढेत ।


स चिरायू: सुखी पुत्री विजयी विनयी भवेत।।





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY