जीवेत शरद: शतं !!! Dr. Nilambari Tendulakar
मी भगवतगिता रामायण किंवा महाभारत वाचलेलं नाही ; पण मी माझ्यापुरती एक व्याख्या केली आहे . प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत . महाभारत या शब्दाला समांतर शब्द षडरिपू आणि माणसाला त्या शक्तिचा शोध घ्यावासा वाटला , ध्यास लागला की भगवतद्विता सुरू झाली , असं समजावं ( व . पु . )
नुसत्या वाचनान माणूस सम्रृद्ध होत नाही तर माणसं वाचतां आली पाहिजे (रुपेश अर्थात मी )
असीच मी वाचलेली पाहिलेली अनुभवलेली
स्थितप्रज्ञ ;धीरगंभीर; मितभाषी ; रोकठोक
कडक शिस्तिची आदरयुक्त दरारा
असाच बर्याच जणांची प्रतिक्रिया असेल
पण मी पाहिलेली अगदी वेगळीआहे
अगदी मनमोकळेपणान दिलखुलास हसणारी
लहांनाशी सुद्धा सामावून जाणारी
रूग्णाला संजीवनी देणारी
कामावर प्रचंड प्रेम करणारी कर्मयोगी
जस्ट आपल Enjoy म्हणत
कुठल्याही सहलीचा मनमुराद आनंद घेणारी आणि देणारीही
निसर्गाशी एकरूप होणारी
नेहमी next generation शी update राहून त्यातला Gap वाटू न देणारी
कुणाच्याही चुका न काढतां त्याला समजून घेऊन सत्य परिस्थिति बघून वागणारी कर्तव्यदक्ष व्यक्ती व
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो अस समजाऊन समाजमनाची अवस्था दर्शवणारी
एक स्पष्ट सरळ प्रेमळ
अन् आपल्या मातीतली व्यक्ती म्हणजे
*डाॅ निलांबरी सामंत तेंडुलकर*
आजच्या सारखे तेव्हा एवढी सहजसोपी व्यवस्था नव्हती पण कुठल्याही गोष्टींचा बाऊ न करता तीने आपली डाॅक्टर होण्याची जिद्द निर्माण केली पुर्णही केली
पती डाॅ दिगंबर हे बालरोगतज्ञ आहेत त्यांची उत्तम साथ लाभल्याने रुग्णाची व तिच्या बाळाची उत्तम काळजी यांच्या रुग्णालयात घेतली जाते
एक आदर्श माता , आदर्श पत्नी ,आदर्श कन्या ; आदर्श सुन म्हणजे निलांबरी
वैद्यकिय व्यवसाय , धार्मिक ऊपक्रम , शिक्षण यासारख्या क्षेत्रातून समाजातील अनेक दुर्बल घटकांचा आधारवड होतायेत
समाजमनाचं भान राखत ताई व सर यांनी लावलेल्या रोपट्याच वटव्रृक्ष व्हावा अन त्याच्या सावलीत अनेकांच्या आयुष्यात आनंद भरतांना आपलही आयुष्य अजून बहराव .
यापुढील आयुष्यात सुद्धा तुमच्या सुखांची अमर्यादित बरसात व्हावी
जीवन सुरांची सुरिली मैफिल व्हावी
हीच या जन्मदिनी परमेश्वर चरणी प्रार्थना
कर्मयोगावर तुझा नेहमीच विश्वास आहे म्हणूनच हा श्लोक तुमच्यासाठी
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment