जीवेत शरद: शतं !!! Dr. Milind Dixit











वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा मिलिंद 





असं म्हणतात मोठ्या व्रृक्षाच्या सावली खाली रोपटे वाढत नाहीत किंबहुना वाढलीच तर ती वृक्षाच्या तुलनेमुळे झाकाळली जातात ; पण याला आमचे मिलिंदजी अपवाद आहेत.





RYK च्या कोनशिलेत ज्याच नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेलय असे आदरणीय श्री दिक्षीत सरांचे चिरंजीव     


        


*       डाॅ मिलिंद दिक्षीत*





  एवढ मोठ नाव जपणं हेच त्याच्या साठी एक दिव्य पण ते त्याने लिलया पेललय;नव्हे तर त्यात वृध्दी करुन दाखवलीच यांत शंखा नाही.


लहान पणापासुनच घरात परोपकाराचे संस्कार पाहिल्याने खरी श्रीमंती कशात आहे हे त्यांना उमगलय  





    आपल वैद्यकिय शिक्षण पुर्ण करुन अनेकांना डोळस करुन आपली जनसेवा आजतागायत तो समर्थपणे तो पार पाडतोय








मनाने अतिशय साधा


बुध्दीने चतुर


अल्पसंतुष्ट


कॅरम व क्रिकेट ची प्रचंड आवड


झगमगाटापासून दुर


पण मित्रांमध्ये रमणारा


टिपीकल विनोद करुन मनसोक्त हसणारा


मराठी गिते गाऊन संपुर्ण रात्र मैफिल रंगवणारा


आवडतां मेनु आल्यावर यजमानास धावपळ करवणारा


हसवणारा , खुलवणारा , इरसाल 


डाॅ मिलिंद  हटके व स्पेशल आहे.








काॅलेजच्या कारकिर्दीत बर्याच  गोष्टी ( कॅरम , क्रिकेट , railway up down ) गाजवल्यात व enjoy केल्यात ,त्यांचा आनंद घेतला.


खरं तर गर्दीत व वलयापासुन दूर राहणारा पण  मनाने अतिशय जवळीक साधणारा साधा विनम्र माणूस म्हणजे मिलिंद .





असेच आयुष्य सदोदित रहावं


वसंत ऋतूप्रमाणे आपल्या आपेक्षांना नवपालवी फुटावी आणी आयुष्यात आनंदाची उधळण व्हावी ह्याच आजच्या जन्मदिनी  सदिच्छा .





सुनिल गावस्कर साठी लिहिलेल्या एका पुस्तकाच शिर्षक आठवलं व खरही वाटलं 





* पुत्र व्हावा ऐसा*! 





लिटल मास्टर सुनिलच्या चित्रपटातील व त्यानेच गायलेलं एक सुंदर गित आपल्या मिलिंदसाठी 





या दुनीयेमध्ये थांबायाला वेळ कोणाला?


हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला


अफाट अशा मैदानी तु येशी वेळोवेळी 


डाव तुझा येताच जमवीशी जपुन आपली खेळी


काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडु फेकी


भवताली तव झेल घावया जो तो फासे टाकी





चतुर आणि सावध जो जो तोच इथे रंगला





हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ....





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY