जीवेत शरद: शतं !!! Dr. Manjusha Wagh







वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजुषा





आनंदाचे  डोही आनंद तरंग , आनंदची अंग आनंदाचे





जगतगुरु तुकोबारायांचं हे अभंगरुपी गाण ऐकल अन् विलक्षण आनंदाची अनुभूती मिळाल्याचा साक्षातकार झाला ! अगदी वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने व्यक्तिवर्णन पूर्ण झाल्यानंतर होणार्या समाधानाएवढा, त्याबद्दल असणार्या आदर व जिव्हाळा या निकोप भावनांएवढा.





      आपल्या बरोबर असणार्या मित्र मैत्रीणींचं चित्र रेखाटल्यानंतर हेणारा आनंद, त्यांवर मिळणारा प्रतिक्रियांचा, कौतुकाचा आनंद अवर्णनीय आहे.असाच आजचा आनंदाचा ठेवा घेऊन आलोय मंजुषाच्या रुपाने !





  डाॅ मंजुषा वाघ हि रेडीओलाॅजीची उपासक , सोनोग्राफीची गाढी अभ्यासक , एक्स रे ची सात्विक साधक. 


इमेजींग चिकीत्सा आत्मसात करुन निरोगी शरीर व निरोगी मन समाजासाठी अर्पिणारी व हिच विश्वसेवा आहे असे मनोमन मानणारी  निखळ आनंदाची प्रचिती देणारी, आश्वासक , मेहनती, साधी , निरागस,आपल्या कामात निपुण,कुशल अन् तरबेज, समाधानी साधक म्हणजे मंजुषा.





तुझं पुढील आयुष्य उज्वलमय, तेजोमय, समाधानी, चैतन्यशक्ती जागवणारं, स्वत:ला आनंद देणारं जावो याच वाढदिवसानिमीत्ताने शुभेच्छा !





जन्मदिन अभिष्टचिंतन !!!





काय सांगू जाले काहिचिया बाही


पुढे चाले नाही आवडीने ।।





गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा


तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ।।





तुका म्हणे तैसा आेतलासे ठसा


अनुभव सरिसा मुखा आला ।।





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY