जीवेत शरद: शतं !!! Dr. Jayant Deokar











HAPPY BIRTHDAY JD...








आज जयंतचा वाढदिवस 





मला  आठवतय १९८६ च अजिंक्य देव वर चित्रित 


माझ घर माझा संसार या चित्रपटातील 


एक छान मराठी गीत 





दृष्ट लागण्याजोगे सारे, 


गालबोटही कुठे नसे


जग दोघांचे असे रचू की 


स्वर्ग त्यापुढे फिका पडे 


स्वर्ग त्यापुढे फिका पडे 








साधारणता १७-१८ वर्षांपूर्वी डाॅ जयंत देवकर यांनी आलेफाटा येथे हाॅस्पीटल सुरु केले व आज त्याने सुरू केलेला अश्वमेध वेगवान झालाय तो त्याच्या मेहनतीने  , 


गोड बोलण्याने 


प्रांजळ स्वभावाने 


अथक परिश्रमाने 


व मनापासून एखाद्या ध्येयाचा पाठलाग केल्याने 


यांत मात्र शंकाच नाही 





मनाने अतिशय निर्मळ 


ज्येष्ठाशी विनम्र 


प्रचंड कष्टाळू 


सतत  धावपळ कामात व्यस्त ,


पत्नी अर्पणाची सार्थ साथ,


शिस्तबद्धता ,


सहकार्यांशी प्रेमळ संबंध 


या गुणविशेषामुळे तो अनेंकाच्या पसंतीस उतरला आहे . अनेंकाच्या गळ्यातला ताईत झालाय . आळेफाट्याची ओळख झालाय .








जयंतचा माहित नसलेला पैलू म्हणजे 


तो खवैय्या आहे 


एक संवेदनशील सखा आहे 


अभ्यासू  , वाचक आहे  


प्रामाणिक  हितचिंतक आहे ( माझ्या प्रत्येक व्यक्तिविशेषला मनपूर्वक दाद देणारा चाहता आहे ) 


मित्रांमध्ये रमणारा  सुदाम्यांसाठी होणारा क्रृष्ण आहे   


कुटुंबाला ,मुलाला गोल्डन टाईम देणारा  क्रिश सुद्धा आहे 


प्रवासाची फिरण्याची आवड असणारा ,आयुष्याचा आनंद घेणारा कुटुंबवत्सल हिरा आहे 





जयंत


परमेश्वराचा क्रृपाशिर्वाद तुझ्यावर आहेच पण ख़र्या अर्थाने  बाबा व आईच्या कष्टाच आज चीज़ झालय . 





यापुढील आयुष्यसुद्धा  यशस्वी  आरोग्यमय  सुखमय व निखळ आनंदमय जाओ 


तुझ्या हातून गरजूंची   दुखिताची   सेवा घडो 


या सत्कर्मासाठी  व  घेतलेल्या जनसेवेच्या सत्कार्यासाठी बळ मिळो याच जन्मदिनाच्या निमित्ताने सह्रदय शुभेच्छा ! 





🎂🎂🎂








स्वप्नाहून सुंदर घरटे, 


मनाहून असेल मोठे





दोघांनाही जे जे हवे ते, 


होईल साकार येथे





आनंदाची अन्‌ तृप्तीची,


शांत सावली इथे मिळे 





जग दोघांचे असे रचू की,


स्वर्ग त्यापुढे फिका पडे


स्वर्ग त्यापुढे फिका पडे..





DR. RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY