जीवेत शरद: शतं !!! Dr. Ananad Tambat
खर तर अगदी सहजच या वाढदिवस शुभेच्छा पत्रास लिहिण्यास सुरुवात झाली पण खरी उभारी मिळाली ती तुमचा सर्वांच्या पुर्वीच्या निखळ कौतुकानं , तुमच्या उत्स्फुर्त प्रतीसादानं . आनंदाची उधळण करता आली ती तुमच्या उर्जा देणार्या प्रतीक्रियांमुळे.
वाढदिवसाचा उत्साह वाढतो किंबहुना द्विगुणीत होतो तो आप्तस्वकियांच्या इष्टमित्रांच्या स्नेहपुर्ण शुभेच्छांनी , त्यात आजुन रंग भरला जातो अन् त्या क्षणांचा सण होतो.
धावपळीच्या जीवनात दोन क्षण विसाव्याचे अनुभवतांना भुतकाळाच्या गोड आठवणी बहारतात त्या याचं दिवशी. उज्वल भविष्याची हुरहूर लागते ती याच दिवशी.
असाच एका मित्राचा आज वाढदिवस आहे व तो म्हणजे *आनंद*.
खरा मित्र, सखा , साथी अगदी नावाप्रमाणे कायम आनंदी राहणारा , मनमिळाऊ, मितभाषी, प्रमाणीक व सच्ची मैत्री निभावणारा.
उच्च शिक्षीत असलेल्या वडिलांनी त्यांच्या उद्योगशिल कुटुंबात आनंदला वैद्यकिय क्षेत्राची दिक्षा दिली व आनंदने या संधीचे सोने केरुन या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करुन, वेगळा ठसा उमटवत त्यांचा नावलौकीक टिकवून ठेवला .
वरवर शांत असणारा, कमी मिसळणारा, Decent आनंद, मात्र क्रिकेट , कॅरम या खेळांमध्ये माहिर आहे. संघर्षाच्या वाटेवरील न थकणारा न डगमगणारा प्रवासी म्हणजे *आनंद*
जीवनाच्या क्रिकेट मधील एक न थांबता सतत पळणारा खेळाडू म्हणजे **आनंद*.
मित्रा तुझ्या आयुष्यात आजुन रंग भरावेत, कौटुंबिक प्रेमाचा सुगंध दरवळावा व तो बहारावा, सप्त सुरणांची उधळण व्हावी , व जीवनात लाभावी फक्त न संपणारी *आनंदयात्रा*.
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment