जीवेत शरद: शतं !!! Dr. Aboli Mundargi











वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा अबोली





डिसेंबर संपुन एक वर्ष संपलं व नवीन वर्ष सुरु झालं





का कुणास ठाऊक पण प्रत्येकाच्या मनांत विचांराची गर्दी होते अन् 


मन आठवणींच्या गावाला जाते . 


काही गोष्टींनी आपसूकच चित्त प्रफुल्लित होतं , सुखावत ,


अस वाटत परत परत हे क्षण आपल्या वाट्याला यावेत ते कधीच संपू नयेत 


तर काही आठवणींनी मन विषन्न होते .





दुखात ऊद्विजते सर्व 


सर्वस्य सुख़म इप्सितम !!








अर्थात सुखाचा मुलमंत्र आपण समजून घ्यायला हवा ,अवलंबायला हवा .





गेल्या वर्षापासून व्यक्तिविशेष साकारतांना अक्षरशा आत्मिक आनंद अनुभवलाय किंवा तो दुसर्याला देतांना तो द्विगुणित झालाय शतगुणित झालाय 


आनंदाचा डोही आनंद तरंग या भावनांची अनुभुतीच साकारलीय . 





अर्थातच माझ्या नजरेतून  , गेल्या २८ वर्षांच्या संगतीमधून  , आलेल्या अनुभवातून , समाजाच्या 


आरश्यातून तुमची  सकारात्मक 


व्यक्तिरेखा साकारण एक वेगळच समाधान दिल्याशिवाय रहात नाही 








अशीच आजची celebrity 





*डाॅ अबोली सोमण मुंदरगी*





Modelling  करण्याऐवजी चुकूनचGynaecologist झाली अस मला नेहमी वाटत , 


क़ायम हसरा चेहरा 


राजबिंड व्यक्तिमत्व 


निरागस प्रतिभाशाली 


शुन्यात हरवलेली नज़र 


विचारांच्या गर्केत मुशगुल 


स्वप्नाळू अदा 


अन् कमालीची sincere 





लोणावळ्याच्या वैद्यकीय आकाशगंगेत लुकलुकणारी तारका





खर तर अबोलीला अतिशय कमी वयात सर्वच गोष्टींची जबाबदारी स्विकारावी लागली , अनपेक्षित अकाली व अविश्वसनिय अशी गोष्टी घडून 


सर्वांच्या मनाला चटका लाऊन गेली होती , 


तीला लहानपणीच मोठेपणाची भुमिका निभवावी लागली पण खरोखर ती आजही मोठ्या हिमतीने पार पाडतीय . सगळीच वादळे आपल्याला उध्वस्त करायला  येत नसतात तर ते फक्त आपली परिक्षा घेण्यासाठी येत असतात अशा परिस्थितीत फक्त पाय रोऊन भक्कमपणे ऊभ रहाण महत्वाच . निर्भयतेन धीरान तोंड द्यायच असत हेच  मनाशी ठरवून 


जणूकाही   mature व परिपूर्ण असल्यासारखी ती कुटुंबासाठी आधारवड झालीय


खरोखर सर्वांसाठी  आदर्श झालीय.





जाने १६ मधील GT चे वेळी मी व जयंतने फक्त एकदाच लोणावळ्याला भेट दिली होती पण अबोलीने एकटीनेच सगळे व्यवस्थीत arrange करुन आतापर्यंत झालेल्या GT पैकी सर्वात सुंदर व memorable असं GT साकारल होतं





तुझ्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे सुखाचे  कर्तव्यपूर्तीचे अभिमानाचे  क्षण येवोत  , 


मनात बघितलेल स्वप्न सत्यात येवोत . 


भगवंताचा आशिर्वाद सदोदित तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा 











वाढदिवस अभिष्टचिंतन





💐💐💐🎂🎂🎂





सरत्या वर्षाला निरोप देतांना कालच एक सुंदर कविता वाचनात आली ती तुझ्यासाठी 








*२०१८*





काळाच्या अनावर


वाहत्या ओघात


आपल्या आयुष्यातल्या काही वर्षांचा


हिशोब काय ठेवणार?





आयुष्याने जर इतकं


अमर्याद दिलं आहे


तर मग जे मिळालं नाही


त्याचा हिशोब काय ठेवणार?





सुहृदांनी दिला आहे


इतका स्नेह, इतकं प्रेम


तर शत्रूंच्या शत्रूत्वाचा


काय हिशोब ठेवणार?





लख्खं उजेडाचे 


इतके दिवस आहेत इथे


तर रात्रींच्या अंधाराचे 


काय हिशोब ठेवणार?





आनंदाचे दोन क्षण


पुरेसे आहेत उमलण्याला


तर मग मनातल्या खिन्नतेचा 


काय हिशोब ठेवणार?





मधूर आठवणींच्या खुणा


इतक्या आहेत आयुष्यात 


की थोड्याशा  दुःखद गोष्टींचा 


काय हिशोब ठेवणार?





इतकी फुले मिळाली आहेत


काही जिवलगांकडून


काटे किती बोचले


याचा काय हिशोब ठेवणार?





चंद्राचे चांदणे इतके


हृदयंगम आहे की


त्यावर कलंक केवढा 


याचा काय हिशोब ठेवणार?





केवळ आठवणीनीच


अंतःकरण पुलकित होत असेल


तर मग भेटलो न भेटलो


याचा हिशोब काय ठेवणार?





काही ना काही नक्कीच


खूप छान आहे प्रत्येकात


मग जरासे काही चुकले असेल तर


त्याचा काय हिशोब ठेवणार? 






२०१९..✍🏻




DR. RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY