ये कहॅा आ गये हम..यॅूं ही साथ साथ चलते
ये कहॅा आ गये हम...
यॅूं ही साथ साथ चलते …..
अमिताभ ने हे गाणे सिलसिला मध्ये म्हटले आहे पण खर तर तो फक्त अभिनय होता , पण हा अनुभव जर स्वत:ला प्रत्यक्षात घ्यायचा असेल तर तुम्हास दोस्ती लेकवुड रिसोर्ट , माळशेज येथे येण्याशिवाय पर्याय नाही.
खर तर १२ फेब्रुवारी च्या स्नेहसंमेलनाची मुहुर्तमेढ २ महिण्यांपुर्वी संदिप वाबळेच्या फोन मुळे झाली. संदिपने मला व JD ला फोन वरून संकल्पना मांडली व त्यास आम्ही अनुमोदन दिले व Get together करायचे तर माळशेजलाच हे पक्के ठरले. नंतर सुनिल आम्हा तिघांना येऊन मिळाला, व त्यानंतर खरी आग्रहाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांना फोन व आग्रह करुन झाले, पण पाहिजे तसे यश येत नव्हते ; तशात omicron मुळे तर GT होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली . नंतर आरोग्यावरील संकट निवळल्यावर मात्र *माळशेज* वर शिक्का मोर्तब झाले.
Organiser Team च्या आग्रहावरून स्वप्ना आम्हाला join झाली व तिथूनच पुढे सर्वांना पुन्हा फोन व आग्रह झाले. मी, सुनील व JD तिघांनी मिळुन *घटनास्थळी*भेट दिली आणि १२ फेब्रुवारी तारीख निश्चित झाली.
आयोजकांनी कोणती कामे कोणी करायची ते ठरले व १२ फेब्रुवारी कधी उगवते असे सर्वांना झाले.
सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांपैकी एका डोंगरमाथ्यावर Dosti Lakewood resort आहे. डोंगराचा पायथ्याशी धरणाच्या बॅक वॅाटरचा भव्य व सुंदर परिसर असुन दुरदुर पर्यंत पाणीच पाणी दिसते. तलावाकडील दिशेने असलेल्या Resort च्या सगळ्या रुम्स् GT साठी आरक्षित केलेल्या होत्या. तलावाकडील पठारावर उभे राहिल्यास खरोखरच स्वर्गात असल्याचा अनुभव येतो. तसेच resort मधील भव्य लॅान व त्यांवर बागडणारी बदकं, कोंबड्या व त्यांची छोटी पिल्ले ; भर दुपारी वाहणारी थंड गार हवा, त्यांवर विहार करणारे पक्षी, गुलाब फुलांची बाग, निळाशार infinity swimming pool असं रम्य वातावरण असलेल्या ठिकाणी GT करण्याचे संदिपचे स्वप्न सत्यात उतरले व त्यात आपण सर्वांनी सहभाग घेऊन आम्हा आयोजकांना साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार व अशी जागा शोधल्यासाठी संदिपचे शतष: उपकार ! व पुढेही अशाच जागा शोधण्यासाठी संदिपला आग्रह.
आणि तो दिवस उजाडला , सर्व *मावळे* दुर दुरून डोंगराच्या पायथ्याशी जमले व मजल दर मजल करत सर्वांनी चढाई करुन *stress test* पास केली व ढोल ताशा आणि फुलांच्या हारांनी सर्व विर , विरांगनांनी अभूतपूर्व अशा स्वागताचा आनंद घेतला. जे सहकारी दुखण्याने आजारी होते त्यांसाठी खास वाहनाची सोय असल्याने ते सुखरुप पोहोचले. चहा, थंड जलपानाने सर्व तृप्त झाले.
दुपारचे जेवण झाल्यावर पत्यांचा डाव रंगला व ज्याने कधी तीन पत्ती खेळ पाहिला वा ऐकला नव्हता, तोही या खेळात रमला ; कळस म्हणजे *नैतीक* वा *अनैतीक* मार्गानी जिंकलाही. सोबत मनिषाने स्वत:ने बनवून आणलेला केक व दिपकने दिल्लीहून आणलेली स्वादिष्ठ मिठाई होतीच.
संध्याकाळी चहा, कॅाफी व खेकडा भजी यांचा मनसोक्त आनंद लुटल्यावर रात्री ८ वा सर्व जण तथाकथित *attractive dress * मध्ये नटुन थटुन आले आणि DJ व karaoke च्या साक्षीने नृत्याचा आनंद लुटला व काहींनी श्रमपरिहारासाठी यथेच्छ मदिरापान करून जीवनाचा खरा आनंद लुटला. रात्री १२ वाजता जेवणं उरकुन नंतर जी गप्पांची मैफिल जमली तीला तर इतिहासांत तोड नाही.
आपला सर्वांचा लाडका व सर्वात हुशार बॅचमेट कौस्तुभ ची love story व नंतर शिक्षणासाठी उपसलेल्या कष्टांची हकिकत ऐकतांना सर्वांची छाती अभिमानाने भरुन न आल्यास नवल. तर आशा जिवाभावाच्या मित्राचा मला तसेच सर्व बॅचमेट्सला सार्थ अभिमान आहे. व त्याने आयुष्यात याहीपेक्षा पुठे जाऊन आपली बॅच, कॅालेज, तसेच नाशिक व कोल्हापूर चे नाव सर्वदूर पर्यंत न्यावे अशी सदिच्छा.
नंतर बॅचचा डॅान उमेशभाऊ यांची love story व जीवनात केलेला रोमहर्षक संघर्ष सर्वांनी प्रथमच त्याच्याच तोंडुन ऐकला .अशा यशस्वी व जिगरबाज व्यक्तीस सलाम !
या गडबडीत व गप्पांच्या नादात कधी पहाटेचे २.३० वाजले ते कळले नाही, व नंतर सर्वजणं निद्रेच्या आहारी गेले.
रविवार सकाळी ५.४५ ला संदिपने सगळ्यांना जागे केले व छोट्या ट्रेकसाठी नेले . तेथे योगा करून झाल्यावर शोभाने आणलेल्या Dairy milk chocolates चा आस्वाद घेत सगळी मंडळी १० वा परत आली व चवदार आशा न्याहारीवर व अबोलीने आणलेल्या लोणावळ्याच्या *चिक्कीवर* यथेच्छ ताव मारला; सोबत सुनील पाटीलच्या love story तील रोमांस, ड्रामा, ईमोशन, थरार, action याची देही याची डोळा त्याच्याच तोंडुन अनुभवला.
तेवढ्यात सर्वांचा परम मित्र प्रविण येऊन पोहोचला व त्यानंतर तासाभराच्या गप्पांमध्ये पुढील GT ची रुपरेषा ठरली.
सर्वानुमते पुढील निर्णय घेण्यात आलेत =
१) प्रतिवर्षी GT घ्यायचीच.
२) NRI मित्र मंडळींसाठी म्हणून डिंसेबरच्या ३ र्या आठवड्यातील शनिवार - रविवार निश्चित केलेत.
(तरी त्यांनी त्या प्रमाणे मायभुमीत येण्याचे प्रयोजन करावे)
३) जास्तीत जास्त उपस्थिती असावी.
( आयेजकांना जास्त म्हस्का मारायला लाऊ नये)
४) ज्या मेंबर्स नी आत्तापर्यंत हजेरी लावली नाही, त्यांची उपस्थिती वाढवणे.
५) नव नविन ठिकाणी GT आयोजित करण्याचा प्रयत्न करणे.
या मिटींग दरम्यान GT ची आठवण म्हणून कॅालेज व बॅच चे नाव तसेच रिसॅार्ट चे फोटो छापलेले मग आयोजकांतर्भे , माझ्या तर्भे आमच्या लासलगावचा प्रसीद्ध भेळभत्ता व पंकज पगार तर्भे रावळगाव चॅाकलेट्स यांचे वाटप झाले.
दुपारी १ नंतर मंडळी आपापल्या घरी जाण्यासाठी जड अंत:करणाने निघाली खरी पण कोणाचाही पाय लवकर निघत नव्हता. परंतु पुढील GT डिसेंबर मध्ये करण्याचे ठरले असल्याने सर्व जणं येणार्या आनंदाच्या क्षणांची वाट पहात परतीच्या प्रवासासाठी निघाले.
सरते शेवटी एवढेच सांगेन की—-
खटखटाते रहिए एहसासोंके दरवाजे,
मुलाकाते और आहटें आनी चाहिए ,
मिल जाता है दो पल का सुकुन चंद यारों की बंदगी में,
वरना परेशान कौन नहीं अपनी
अपनी जिंदगी में । ———-
अपना खयाल रखें !!!
Members of organising committee
1) Sandeep Wable
2) JD
3)Swapna
4)Sunil Patil
5)Rupesh Thakur.
Comments
Post a Comment