जीवेत शरद: शतं !!! Dr. Swati Pawar
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वाती.... खरं तर काॅलेज च्या संपूर्ण कालखंडात हिचं आणि माझं एकदा ही संभाषण झालं नाही...नागपूर group special batch मध्ये स्वाती देशमुख नावाची एक मुलगी आहे Tom boyish आणि सगळे तिला JACK नावाने ओळखतात...एवढीच काय मला तिच्या बद्दल माहित... इतकी वष॔ं झाली आणि ती group मध्ये add झाली....तेव्हा पासून Hi Hello चा परिचय....हिच्या बेधडक post.सगळ्यांना दखल घ्यायला लावणारया.. रूपेश, रूपाली सारखं हिचं भाषेवरील प्रभुत्व खास करून English अचंबित करणारं.... sense of humour ही जबरदस्त....आणि प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाला तितक्याच सडेतोडपणे, चपखलपणे उत्तर देण्याचा कणखरपणा कौतुक करण्यासारखा.. कधी विचार करायला लावणारे , कधी स्तब्ध करणारे तर विनोदाने गंभीर विषयाला हात घालणारे blog वरील लेख..खरचं कौतुकास्पद.... UG नंतर PG नंतर job at various places आणि आता MS and chief editor at medical college..at pondicherry..हा हिचा प्रवास ही थक्क करणारा... लोकांना प्रभावित करण्या चे गुण रक्तातचं असावे लागतात..आणि हिला तर अमरावती च्या देशमुखांचा वारसा लाभलेला... आणि तो ती नेटाने पुढे नेत आहे.( कधी कधी ती मुरब्बी राजकारणी वाटते भविष्यात अमरावती ची खासदार आणि मग मंत्री झाली तर कुणाला आशचय॔ वाटू नये )
माझ्या anesthesiologist madam Dr . Mrs . Gorde यांच्या मुलाने pondicherry ला MBBS ला admission घेतल्यावर जेव्हा मी स्वातीला फोन केला तेव्हा ज्या प्रकारे तिने सव॔तोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं...तेव्हा आपल्या हक्काचं माणूस असलेले जाणवलं...Friend in need is friend indeed......आमचे किती तरी मतभेद आहेत , तरीही या वादविवादात आपले मत तक॔ शुद्ध रीतीने , मुद्देसूद पणे , संयमाने आणि संतुलित कसे मांडावे हे स्वाती कडून शिकावे....college काळात जर अशा वादविवाद स्पर्धा असत्या तर स्वातीने सगळ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला असता.. वैयक्तिक जीवनात कठीण प्रसंगांना धीरोदात्त पणे सामोरी जाणारी स्वाती एक अजब रसायन आहे..माझ्या कुठल्या ही post ला दाद देणारी.. मनापासून हसणारी आणि मनमुराद हसवणारी..प्रत्येक गोष्टीत आनंद घेणारी... आणि आपल्यात मतभेद आहेत, मनभेद नाहीतं...हे स्पष्ट पणे मान्य करणारी ...स्वाती.... .तुला वाढदिवसाच्या अनगिणत शुभेच्छा...Wish you good health and happiness ..
DR JAYANT DEOKAR
Comments
Post a Comment