जीवेत शरद: शतं !!! Dr. Shilpa Ambekar
* डाॅ शिल्पा चौधरी*
मध्यम उंचीची
सडपातळ बांधा
डोळ्यावर नंबरचा चष्मा
सरळ लांब केस
सतत हसरा चेहरा
विनम्र स्वभाव
अन् बोलतांना नेहमीच आदरशील ,
मुंबई व परिसरातील पेशंटसाठी ईश्वरीसमान व्यक्तित्व !
आपल्या मात्रृभूमीलाच कर्मभूमि माणून तिथेच राहून साधी रहाणी व उच्च विचार या आदर्शवादितावर विश्वास ठेवणारी
मेहनती , प्रामाणिक व
आपल्या चौकस बुद्धिमत्ता व कष्ट यांची सांगड घालून सतत प्रयत्नशील रहाणारी एक योद्धा !
शहरी भागातील विद्यार्थी हा नक्कीच कुठल्याही क्षेत्रात काकणभर का होईना सरसच असतो यात सर्वोत्तम ऊदाहरण म्हणजे डॉ शिल्पा
याच कारणाने नवीन पिढितील मुलांनी मलाही तुमच्यासारख डॉक्टर व्हायचय अस म्हटल की छाती अभिमानान फुगते सर्व यातना व नकारात्मक विचार नाहीसे होतात
अन् वाटत आपल कामच बर अन् गड्या आपला गाव बरा !
डॉ शिल्पा व तीला समर्थ साथ देणारा आपला बॅचमेट अनिरूध्द ,अपार मेहनतीने आपण आजपर्यंत इथवर पोहचलात पण अजूनही यश तुम्हाला खुणावतय यशाला गवसणी घालण्याच तंत्र व कष्टाचा मंत्र तुमच्याकडे आहेच ,
या अपेंक्षाना आमच्या मनपूर्वक शुभेच्छाच कोंदण लाभाव
आपल जीवन अजून आनंदी व्हाव या स्नेहमय शब्दाबरोबर वाढदिवस अभिष्टचिंतन !
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment