जीवेत शरद: शतं !!! Dr. Sandip Wable









सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडुत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, "भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?" तो म्हणाला,"पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन." "मग काय करणार?" हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,"मग काय, निवांतपणे जगेन." यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, मग आतापासुनच का निवांत जगत नाहीस?


यातुन सिकंदरला काय समजल माहीत नाही; पण डाॅ संदिप वाबळेंना त्यातलं मर्म तेव्हाच समजलय 








स्वमालकीची प्रशस्त  वास्तु  


 शेजारी मोकळी जागा 


कुठलाही धावपळ नाही 


 कसलीही स्पर्धा नाही 


कुटुंबात रमत व 


रेडीओलाॅजी तज्ञ म्हणून शांतचित्ताने करत असलेली  रूग्णसेवा 


असा आहे सरांचा दिनक्रम 


अगदी हेवा वाटावा असा 





साधारणता १८ -१९वर्षांपूर्वी कोपरगावात एक तरूण काही ध्येय मनाशी ठरवून आला अन् आजही त्याचसाठी धडपडतोय 





ऊस , साखर व राजकारणाने जगभर नावाजलेल कोपरगाव बर्याच धुरींधराच्या नावाने गाजलय व आताही गाजतय ते डॉ वाबळेंमुळे





अतिशय साधाभोळा


आपल्या स्वतातच रमणारा 


सतत प्रयोगशील 


संशोधनात  मग्न 


संवेदनशील  सहसा तडजोड न स्विकारणारा 


अगदी मोजके पण मनापासून मित्र बाळगणारा


कधी बोलघेवडा तर कधी समुद्रापेक्षाही खोल विचार करणारा एक असाधारण अवलिया 





    रोज योगा , प्राणायाम करणारा व इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणारा हा आमचा मित्र उत्कृष्ट देश पातळीचा जिमनॅस्ट  असल्याचा सर्वांना सार्थ अभिमान आहे


           


         नगर जिल्हयात सर्वप्रथम लिंगभेद चाचणी व स्रीभृणहत्येस विरोध करणारा व इतरांनाही त्यासाठी मार्गदर्शन करणार्या मित्राचा आम्हाला गर्व आहे








वफ़ादारी की वो रस्में,       


निभाएँगे हम तो कसमें 


एक भी साँस ज़िन्दगी की, 


जब तक हो अपने बसमे





 आपल्या गृपचे जन्मदाते


सर आजच्या या जन्मदिनी 


तुमच्या या नवीन साधनेला 


नव्या प्रयत्नांना  मनपूर्वक  शुभेच्छा 





💐💐💐





जयवंत व्हा 


यशवंत व्हा 


किर्तीवंत व्हा 








👍👍👍





DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY