जीवेत शरद: शतं !!! Dr. Sandip Aware
महाभारतात संजय हा महर्षि व्यासांचा शिष्य पण दिव्यद्रृष्टी लाभल्याने कुरुक्षेत्राच व कौरव पांडवांच आँखों देखा ध्रृतराष्टाला सांगायचा ,
आताचा मात्र हा
वैद्यकीय क्षेत्रातील सत्य परिस्थितिची जाणीव करून देणारा ,
आयुष्य कस जगाव हे शिकवणारा ,
नाविण्याची कास धरणारा ,
योग्य अयोग्य हे वेळेनुसार ठरवणारा ,
२१ व्या शतकातील जीवनयुद्धाला आनंदाने विनाशस्र सामोर जाणारा ,
शांततेसाठी तह करणारा,
आधुनिक संजय म्हणजे
* डाॅ संदिप आवारे*
नक्कीच स्पृहनिय आहे
,तेजोमय आहे ,
अनुकरणीय आहे.
Very cool
Brilliant
Charming
अतिशय चाणाक्ष
चतुरस्र
बेधड़क अन्
प्रचंड हुषार
एकदम हटके
आम्ही त्याला चॉकलेट बॉय म्हणतो
असा १९९१ बॅचचा ऋषी कपूर म्हणजेच
डॉ संदिप आवारे .
सोबर पेहराव
Ray ban sunglasses
Swiss wrist watch
iPhone mobile
Adidas shoes
Stylish look
या सर्वांचा ऊपभोग घेतला असेल तर तुम्हीच !
सौ मॅडम अन संदिप म्हणजे
made for each other couple
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद ही जोडी घेतेय ,
सतत हसतमुख व सात्विक अध्यात्मिक व्रृत्ती ,
प्रचंड ऊर्जा असलेला हा आमचा मित्र असल्याचा आम्हाला अभिमान आहे , या सुंदर जोडीसाठी सदिच्छांच यशवंत देव यांच
गाण नक्कीच म्हणावंस वाटेल
जीवनात ही घडी अशीच राहू दे ।
प्रितिच्या फुलावरी वसंत नाचू दे ।।
खर तर संदिपचा स्वभाव ऊलगडून पहातांना मला अनेक कंगोरे जाणवतात , अगदी त्यांच्या रंगभूषा अन वेशभूषेसारखे ,सप्तरंगी .
आवारे परिवाराला जपणारा निरागस पुत्र ,
एक लवेबल हसबंड
मुलांची फुलासमान काळजी घेणारा प्रेमळ पिता
मित्रांसोबत रमणारा नाॅटी सवंगडी ,
पेशंटला २४*७ सेवा देणारा धन्वंतरी,
सध्या फिटनेस महत्वांचा हे पटवून देणारा कोच !
जणू काही नया दिन नयी रात मधला संजीव कुमार !
म्हणूनच
संदिप तुला ३५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तप्त वैशाखातही सुखद गारवा देणार तुझ शीतल व्यक्तिमत्व असच खुलत राहों
यापुढील आयुष्यही असेच आनंदी सुखमय प्रसन्न व निरोगी जाओ !
दरवर्षी तुझ्यासोबत एखादी वारी अनुभवता यावी अन तुझा हा वारू सदोदित दौडत राहो !
याच सदिच्छासह
जन्मदिन शुभकामना !!!
DR. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment