जीवेत शरद: शतं !!! Dr. Rupali Parikh









वाढदिवसाचा हार्दीक शुभेच्छा रुपाली 





प्रत्येक पिढीला , बँचला आपल  स्वताच अस्तित्व आहे  ,अभिमान आहे  .





आपण स्वत: किती ख़स्ता खाल्या , किती संघर्ष केला हे पुढच्या पिढीला पटवुन देण्यात धन्यता मानतो पण नेक्स्ट जनरेशनला त्याच गांभीर्यच नसत हा प्रत्येकाचा अनुभव आहे .


शैक्षणिक क्षेत्रात पाहिल तर आमच्या वेळी असं नव्हत हे मात्र नक्की ,


कुठलेही कोचिंग क्लासेस नसतांना  केवळ जिद्द व अपार मेहनतीच्या बळावर , चिकाटीने कोणत्याही गोष्टींचा बाऊ न करता  घेतलेली ऊंच भरारी , 


जो संघर्ष अजूनही संपलेला नाही 


अस   सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 





        *डाॅ. रुपाली गुजराथी पारिख*








  दहावीला असतांना आम्हाला बालमोहन विद्दामंदीर , दादर शाळेतील हुशार विद्यार्थांनी सोडविलेल्या उत्तर पत्रीका दाखविण्यात आल्या होत्या , मला आजही आठवतेय त्यातील काही रुपालीच्या होत्या. उत्तम हय्ताक्षर, उत्तरांची मुद्देसुद मांडणी  व लिखाणाची शैली पहाता त्यांच वेळी लक्षात आल होतं की ही scholar विद्दार्थीनी  आयुष्यात खुप पुढे जाणार व खुप काही achieve करणार.








गृपला उत्तम मार्क असुनही Govt. काॅलेजचा प्रवेश थोडक्यात हुकला व तिला  N D M V P काॅलेज ला अॅडमिशन मिळाली. खरं तर १९९१ ची आपली सर्व बॅच भाग्यवान आहे की रुपाली सारखी हुशार, सोज्वळ , शांत मुलगी आपली बॅचमेट आहे. 





आयुष्यात कष्टावीना काहीही मिळत नाही हे ब्रीदवाक्य  मनाशी बाळगनारी रुपाली अजुनही अवीरत मेहनत होऊन सर्व pathogens बरोबर जोमाने लढतेय.





माझ्या प्रत्येक लेखावर आवर्जुन दाद देणारी रुपाली प्रत्येक GT ला हजर राहुन सर्व मित्रमैत्रीणींमध्ये चैतन्य जागविते.





आज रुपालीचा जन्मदिवस 








 रुपाली तुझ्या जीवनात अजून यश सुख व आनंदाची बरसात व्हावी !


आपल्या धार्मिकतेला अजून सत्कर्माची बळकटी मिळावी ! 


नावाप्रमाण विशाल व पवित्र विचांराच रोपण व्हाव व आयुष्य सम्रृद्ध व्हाव याच मनःपूर्वक सदिच्छां ! 






वाढदिवस अभिष्टचिंतन !!!!




DR. RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY