जीवेत शरद: शतं !!! Dr. Ramesh Nimse
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा रमेश
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेऊन तुम्ही फक्त लढ म्हणा
——कुसुमाग्रज
आता इथं कुणालाच सुखाचे २ घास मिळत नाही
राजे तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राज्य कुणाचे आहे हेच कळत नाही
——- डाॅ विठ्ठल शिंदे
ऐतिहासिक नाशिकच्या सुसंपन्न , धार्मीक व समाजाभिमुख अशा निमसे परीवारातील मोतीराम काकांच नाव आजुन उज्वल करत आपल्या लोकप्रियतेच वलयनिर्माण केलय ते फक्त सुसंस्कार , सुसंगत, सृजनशील चारीत्र्य व आत्मनिष्टेच्या बळावर असे आमचे परम मित्र व आजचे सत्कारमुर्ती
* रमेश उर्फ रामभाऊ उर्फ रॅंबो निमसे*
अत्यंत लाघवी , प्रेमळ, अलवर, हळुवार , आग्रही व थिजऊन टाकणार्या भावनीक व मनमोहक शब्दांची जादु जणू संमोहीत करुन टाकते अन् समोरचा हिप्वोटाइज झाल्या सारखा तो सांगेल तसा करायला लागतो हा माझाच नाही सर्वांचा रमेश विषयी अनुभव आहे.
नाशिकरोड च्या नवरत्नांपैकी एक रत्न असलेला रमेश हा आमचा मित्र असल्याचा अभिमान आम्हाला आहे.
कडक शिस्तीत वाढलेला, शिस्तबध्द, घड्याळाला प्रचंड महत्व देणारा,
स्वावलंब, परोपकार, व सामाजिक बांधिलकी जपणारा,
बोलघेवडा,मिठासवाणी बोलणारा,
GT च्या कामासाठी निसंधीग्ध कसाही कधीही कुठेही तयार असणारा,
अदबशीर, उत्कृष्ट वक्ता,उत्तम वाचक व संयमी श्रोत्रा,
प्रचंड उर्जा असणारा, उत्साह ओसंडून वाहणारा,
प्रतिदिनी योगा , व्यायाम , meditation, running करणारा,
जिंदादील , बहुआयामी व्यक्तीत्व म्हणजे
_*
*डाॅ रमेश निमसे.**
वैयक्तिक आयुष्यात आपणांस जो जे वांछील ते तो लाभो .
येत्या वर्षात डाएट , जिम, meditation व वहीनींचा सल्ला या सुत्रांनी तुमचे वजन ७० च्या खाली जावो व आपण आजुन तरुण दिसाव ! याचं आजच्या वाढदिवशी आई जगदंबेचरणी प्रार्थना !
पुनःश्च वाढदिवस अभिष्टचिंतन ,
जयवंत व्हा, किर्तीवंत व्हा !!!!
DR RUPESH THAKUR
Comments
Post a Comment