जीवेत शरद: शतं !!! Dr. Pravin Gore







वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रविण








 महान नाटककार शेक्सपियरच एक वाक्य आहे नावात काय आहे ? 


पण मला नेहमी वाटत ,


बस नाम ही काफी है !


काहींच्या नावातच इतका दम असतो की ते नाव त्याची ओळख  बनवते , वलय निर्माण करते . 


असच एक नाव आहे 





           *गोरे*





आमच्यासाठीही हे नाव मनांत बसलय ते डाॅ प्रविणच्या रुपाने , 


डॉ प्रविण गोरेच्या व्यक्तिमत्वान !





   मुंबई ते नाशिक - व्हाया आडगाव हा मित्रांनी भरलेला सुखमय प्रवास आजही आम्हाला खुणावतो !





     विषय कुठलाही असो राजकारण  , समाजकारण  वा मेडिकल ,


सखोल अभ्यास 


सडेतोड ऊत्तर ,


कुठलाही चोपडेपणा नाही 


अगदी ठाम  , एककल्ली मत ,


सिधी बात नो बकवास !





  अभ्यासाची व   पर्यटनाची प्रचंड आवड असणारा प्रविण आयुष्याचा मनमुराद आनंद घेतो ,


परिसरातील  तसेच परदेशातीलही सर्व प्रेक्षणिय स्थळांची इत्यंभूत माहिती असलेला एकमेव गाईड म्हणजे प्रविण,


मित्रांच मोठ वर्तुळ असलेला सांगाती ,


नवनवीन टेक्नाॅलाॅजीचा वापर करून नव्या कल्पनाविलासात रमणारा ,


नेहमी अपडेटेड रहाणारा ,


सबसे आगे सबसे तेज़ ,


कधी विडंबनकार 


तर कधी तत्ववेत्ता बननारा ,


पुरोगामी विचारांची कास धरणारा , 


पॉवरफुल , राष्ट्रवाद जोपासणारा ,


जशास तसे ऊत्तर देणारा 


मिश्किल हजरजबाबी


उत्कृष्ट निवेदक , 


सुस्पष्ट वक्ता ,


कुशल  संघटक , 


 प्रत्येक GT मध्ये सहभागी होऊन आता


मुंबई GT ची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेलणारा  आपला  प्रिय मित्र  डाॅ प्रविण गोरे.





डॅा प्रविण गोरे यांचा आज जन्मदिवस !





मित्रा 


फुलांच्या सुगंधापेक्षा छान असतो चारित्र्याचा वास या सुभाषितासारख तुमच्या जीवनात नेहमी आनंदाचा ,किर्तिचा सुवास  पसरावा ! 





विविध छंद जोपासतांना नवनवीन रंग तुमच्या आयुष्यात भरावेत व त्यान आयुष्य अजून सुंदर वैभवशाली व सुखसंपन्न व्हाव ! 





    आज दसरा आहे , तुला व तुझ्या कुटुंबीयांना तसेच सर्व मित्रमैत्रीणींना व त्यांच्या सर्व कुटुंबीयांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा . 





     तसेच सगळ्या बॅचमेट्सना विनंती कि जास्तीत जास्त संखेने Get together ला  यावे व सर्वांनी हा सोहोळा अनुभवावर व गोड आठवणी आयुष्यभरासाठी सोबत न्याव्यात .








आपल्या जीवनात आनंदाची ऊधळण व्हावी याच आजच्या मंगलदिनी शुभेच्छा !!!





💐💐💐🎂🎂🎂








DR RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY