जीवेत शरद: शतं !!! Dr. Pankaj Navandar







प्रिय पंकज

स . न . वि .वि . 


पत्रास कारण की , 





जुन महिना म्हटल की तुझ्या अंगात ऊत्साह संचारलेला असतो , 


७ जूनला पावसाळा चालु होतो तसा तुझा उत्साह वाढू लागतो ,


अन् ११ जुनला तर आप्तस्वकिंयासाठी  सण;


दुग्धशर्केराबरोबर  बुधाची  जिलेबी 


असा योगायोग ! 





ज्ञान , निर्भयता , संघर्ष हा मंत्र फक्त उच्चार न करता तो प्रत्यक्षीकृत पचवण्याचे तुझी विजीगीषीवृत्ती नक्कीच सर्वस्पर्षी , सर्वव्यापी झालीय.





सामाजिकतेच भान जपणारं  , समाजाला दिशा दाखवणारं , अनिष्ठ प्रथा थांबवून प्रगती साधणारं , वही पेनाला महत्व देणारं 


तुझ व्यापक ऊद्दिष्ट यामुळ साध्य होईल यात शंका नाही . 





 सिन्नर मधील नावंदर  या सधन कुटुंबातुन 


 तुझा प्रवास नासिकच्या  NDMVP MEDICAL COLLEGE  च्या सांस्कृतीक वातावरणात झाला ,


इथ न थांबतां  लोणीतुन स्त्रीरोगतज्ञ बनुन आज सिन्नर परिसरातील पेशंट करीता दु:ख निवारण्याचे काम करतोय .





भरदार देहयष्टी  ,गव्हाळ रंग , व तुला शोभणारे डोळे  तुझा स्वभावच सांगून जातात , 


निखळ आनंद घेत व देत तू अनुभवणारी स्वच्छंदी जीवननिष्ठा  काही निराळीच  आहे ! 


अगदी एखाद्या हॅपी मॅन सारखी !


वाचक लेखक याबरोबरच एक चांगला कौटुंबिक   फलंदाज आहेस ;


नात्यांच मोठेपण जपणारा  कुटुंब प्रमुख आहेस ,


मित्रांसाठी सुदामा आहेस ,


विचारांनी सजणारा दलाई लामा आहेस . 








 पंकज खरतर अतिशय परिपक्व व भक्कम विचारधारा तुझ्याकडे आहे ,


मनाची श्रीमंती आहे ,


ज्ञान  , कौशल्य , मनमिळाऊ स्वभाव  , निर्झर ओलावा  , हसतखेळत  स्वत:ला व इतरांनाही आपलस करण्याची व्रृत्ती आहे . यामुळेच तु अभिव्यक्तिचा आभाळ झालाय , 


चळवळीचा जागर झालाय 


चैतन्याचा सागर झालाय 





आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला आणखी काय शुभेच्छा देऊ ? 





तुझं आयुष्य असच फुलत फळत राहो !





या आयुष्याचा प्रवास बोधीव्रृक्षाच्या फांदीसारखा बहारदार होत राहो याच मनःपूर्वक शुभेच्छा 





अत्त दीप भव..


 ( दु:खापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभराची सगळी धडपड सुरू असते. ) 


         


लोभ आहेच , व्रृंद्धीगत व्हावा कळावे 








आपलाच 


 डाॅ रुपेश ठाकूर





DR. RUPESH THAKUR


Comments

Popular posts from this blog

आठवणीतला म्हाळशेज....

जीवेत शरद: शतं !!! DR. VIJAY