जीवेत शरद: शतं !!! Dr. Jitendra Patil
. दिन है सुहाना आज पहिली तारीख है !
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा JP.
खुश है जमाना आज पहिली तारीख है !!
लहानपणी दर महिन्याच्या पहिल्या दिवशी रेडिओवर हे गाण लागायच , खुपच आवडायच ,
अगदी तसच feeling आज मला होतय ,
आज डॉ *JP* याचा वाढदिवस
एवढ मोठ होऊनही ज्याने बालपण अजूनही जपलय त्या ,मनान मोठ्या अश्या
दरिया दिल मित्राचा जन्म दिवस !
जितेंद्र आणि पाटील या दोन्ही नावाचा करिश्मा ज्यांनी अंगीकारलाय अश्या धुरंधराचा जन्मदिवस !
खर तर लहानपणापासून काॅन्वेंट माध्यमातून शिक्षण घेतलेल्या व पुढे NDMVP MEDICAL COLLEGE नाशिक येथुन MBBS व नंतर MGM मुंबईतून पद्वीत्तर आस्थीरोगतज्ञाची degree घेणारा sincere विद्यार्थी .
आतापर्यतचा प्रवास तसा विनासायास व सुखकर होता ,आता ortho hospital successfully चालवण्याचे आव्हान व कठीण रस्ता असूनही त्याने तो आपल्या शैलीने मेहनतीने व कष्टमय संघर्षाने सोपा बनवलाय .
अस्थिरोग शास्रात तो पारांगत असूनही त्यांचे मन स्वस्थ बसत नव्हते आता तर त्याने एक छान रस्टाॅरंट टाकुन ते उत्तमरित्या चालऊन दाखवले व त्याच्यात लपलेला उद्येाजक दाखउन दिलाय .
अस्थिरोगतज्ञाचा सफेद कोट घालुन रुग्णांची सेवा करण्याबरोबरच त्याने क्रिकेटचा सफेद dress घालुन व हाॅटेल विश्वातला वलयांकीत कोटही लिलया पेललाय ,
अशा बहुरंगी बहुआयामी मनमोहक व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्वाच कौतुक करावच लागेल .
डाॅ जितेंद्र पाटील म्हणजे निष्णात सर्जन ,
वेदना आणि दुख निवारण करणारा प्रथितयश अस्थिरोगतज्ञ ,
POP व C Arm बरोबर OT त रमणारा पेशंटची काळजी घेणारा ,
गंभीरतेने Reduction ,Nailing & plating करणारा
तितकाच जाॅली ,
मनमोकळेपणान बोलणारा सांगाती ,
हाॅस्पीटल असो की जीवनशैली, व्यायाम , असो की परदेश प्रवासवर्णन यांवर तो भरभरून उत्साहाने बोलताे .
खुप जणांना तेा व्यायाम व क्रिकेटचं महत्व पटवून देतो व दररोज सकाळी तो आपला हा छंद जोपासतो ;
काॅलेजमध्ये असतांना six मारुन तु सुचेताची wicket काढलीस.
IPL सारखा तुझ्या आयुष्याचा प्रवास वेगवान पण सुखमय व्हावा ,
मेहनतरुपी gloves व समाधानरूपी स्टंप मुळे अपेक्षित score तु संयमित वेळेत गाठावा
अारोग्य व संपत्ती या पीचचा संतुलितपण तुझ्या संयमी स्वभावरूपी बॅटने राखावा
समत्वरूपी बुद्धीयोगाने जीवनाला स्थिरता यावी
व सदोदित समाधान लाभावं
आपल्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जाव्या याच आजच्या जन्मदिनी पांडुरंगाचरणी प्रार्थना !
Happy birthday
DR. RUPESH THAKUR
Comments
Post a Comment